पुणे जिल्हा | उरूळीत ७०७ दात्यांचे रक्तदान

सोरतापवाडी {प्रतिनिधी} – ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनच्या (उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप) यांच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त (१४ जुन) बी. जी. शिर्के बाल विकास मंदिर, महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीरात एकूण ७०७ दात्यांनी रक्तदान केल्याची माहिती संतोष चौधरी व सहकाऱ्यांनी दिली. युवकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास भेट म्हणून रोप देण्यात आले. रक्तदात्यांनी केलेल्या कर्तव्यपूर्तीचा सन्मान म्हणून प्रत्येक रक्तादात्यामागे एक वृक्षाची लागवड अल्पावधीतच फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
२०२० सालापासून रक्तदान शिबीरे आयोजित केली जात असून आतापर्यंत एकूण नऊ शिबीरांच्या माध्यमातून ४००० रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. शिबाराला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, साहित्य आदी क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, यशवंत कारखान्याचे माजी चेअरमन के. डी. कांचन, संतोष कांचन, राजेंद्र टिळेकर, रामभाऊ तुपे, काळुराम मेमाणे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, हेमलता बडेकर, सुभाष टिळेकर, प्रकाश गुळवे यांनी भेट दिली.
मनोज महाडीक यांनी प्रास्तविक केले. रक्तदान शिबिरासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुगणालय ब्लड बँक विभाग आणि तर्पण ब्लक बँक यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन ऋषीकेश भालेराव यांनी केले. संदेश कुंभार यांनी आभार मानले.





