Blood donation : दिघीत 6 सप्टेंबरला रक्तदान शिबिर
Blood donation : विघ्नहर्ती साई हॉस्पिटल व लॅबोरेटरी आणि पी.एस.आय. ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने दिघीत ६ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन.

Blood donation : ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या उपक्रमांतर्गत विघ्नहर्ती साई हॉस्पिटल व लॅबोरेटरी आणि पी.एस.आय. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर विघ्नहर्ती साई हॉस्पिटल व लॅबोरेटरी, दत्तनगर, दिघी येथे होणार आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवर नगरसेवक उदय गायकवाड आणि नगरसेवक विकास डोळस यांच्या हस्ते होणार आहे.
रक्तदानासाठी दात्याचे वय १८ ते ६५ वर्षे, वजन ४५ किलो किंवा त्यापेक्षा अधिक आणि हिमोग्लोबीन १२.५ ग्रॅम असणे आवश्यक आहे. रक्तदानाच्या २४ तास आधी मद्यपान टाळावे. तसेच रक्तदानापूर्वी ६ ते ८ तास पुरेशी झोप घेणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.






