पुणे- कै. अक्षय शेखर पवार यांच्या स्मरणार्थ गुरुवार पेठेतील अक्षय मित्र परिवार, मीट युवर्स मेकर्स ग्रुप आणि शार्दुल मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, उल्हास मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदानाच्या १६० पिशव्यांचे संकलन करण्यात आले. एका मित्राने दुसऱ्या मित्राला वाहिलेली श्रध्दांजली असे शिबीराचे स्वरुप होते. “व्हेलेंटाईन डे” पार्श्वभभूमीवर दरवर्षी हे शिबीर आयोजीत करण्यात येते राम बांगड , यांच्या रक्ताचे नाते ट्रस्ट, पीएसआय ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिबीर आयोजित केले होते. यानिमीत्त रंगावलीकार प्रथमेश पाटील यांनी अक्षय पवार यांची रंगावलीव्दारे प्रतिमा साकारली होती. पवार यांचे हे सहावे पुण्यस्मरण होते.