शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन; पोलीस पोहोचले राजू शेट्टींच्या निवासस्थानी

Shaktipeeth Expressway | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वकांशी अशा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाला 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांसह, विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील तीव्र विरोध दर्शविला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्कजाम आंदोलन
नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज कोल्हापुरातील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्कजाम आंदोलन होणार आहे. शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर महामार्ग रोको आंदोलन करत प्रस्तावित महामार्गाच्या विरोधात आज शेतकरी, नेते एकजूट झाले आहेत.
राजू शेट्टी यांना कोल्हापूर पोलिसांची नोटीस
मात्र त्यापूर्वी शक्तिपीठ महामार्गावर चक्काजाम आंदोलनात सहभागी 15 प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या राजू शेट्टी यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. Shaktipeeth Expressway |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी ११ वाजता पुणे -बंगळुरू महामार्ग, पंचगंगा पूल शिरोली या ठिकाणी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. शेकडो शेतकरी या पुलावर जमले असून पोलीसही दाखल झाले आहेत. पुणे-बेंगळुरू महामार्गावर जमावबंदी लागू करण्यात आली असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. Shaktipeeth Expressway |
हेही वाचा :





