Abhishek Sharma Wicket : ईडन गार्डन्सवर ‘थर्ड अंपायर’चा राडा! अभिषेक शर्माच्या विकेटवरून मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा, पाहा VIDEO
Abhishek Sharma Wicket : अभिषेक शर्माच्या विकेटने मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

Abhishek Sharma Wicket Controversy KKR vs SRH : आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात केकेआर आणि एसआरएच यांच्यातील लढत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याने एकाच षटकात दोन मोठे बळी घेत हैदराबादला हादरवले, मात्र अभिषेक शर्माच्या विकेटने मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. नक्की काय घडलं? जाणून घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्सचा नवा हुकुमी एक्का ब्लेसिंग मुझरबानीने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या षटकात १६ धावा खाल्यानंतर मुझरबानीने आपल्या दुसऱ्याच षटकात पुनरागमन करत हैदराबादचा कर्णधार इशान किशन आणि स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा यांना अवघ्या तीन चेंडूंच्या अंतरात तंबूत धाडले. मात्र, अभिषेक शर्माच्या बाद होण्यावरून तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अभिषेक शर्माच्या विकेट्सचा वाद –
𝐓𝐡𝐞 𝐝𝐢𝐩, 𝐭𝐡𝐞 𝐝𝐢𝐯𝐞, 𝐭𝐡𝐞 𝐂𝐀𝐓𝐂𝐇. 🤌
Varun Chakaravarthy pulls off an absolute blinder at deep square-leg to dismiss the dangerous Abhishek Sharma 🥵#TATAIPL 2026 | #KKRvSRH | LIVE NOW 👉 https://t.co/ySCLEcJOUA pic.twitter.com/jXoaMbiOUy
— Star Sports (@StarSportsIndia) April 2, 2026
मुझरबानीच्या एका संथ चेंडूवर अभिषेकने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू नीट बॅटवर आला नाही. डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने पुढे झुकून कॅच घेतल्याचा दावा केला. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीच्या अत्यंत जवळ असल्याचे दिसत होते, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मात्र, अनेक अँगलने पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी अभिषेकला ‘आऊट’ दिले. अभिषेक या निर्णयाने प्रचंड संतापलेला दिसला आणि नाराजी व्यक्त करतच तो ४८ धावांवर (२१ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार) माघारी परतला.
हैदराबादची घसरगुंडी –
अभिषेक बाद होण्यापूर्वी मुझरबानीने कर्णधार इशान किशनलाही (१४ धावा) रिंकू सिंगच्या हाती झेल द्यायला लावून बाद केले होते. एका क्षणी १ बाद १११ धावांवर सुस्थितीत असलेला हैदराबादचा संघ अचानक ३ बाद ११२ अशा अडचणीत सापडला. २९ वर्षीय मुझरबानीसाठी हे विकेट्स अत्यंत खास ठरली. कारण हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील पहिलीच विकेट आहे. झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स काढून कोलकात्याला सामन्यात पुनरागमन करून दिले.





