Nagpur Factory Blast : नागपूरमध्ये बर्फाच्या कारखान्यात स्फोट
Updated On:

Nagpur Factory Blast – उप्पलवाडी परिसरात असलेल्या बर्फाच्या कारखान्यात आज (6 जानेवारी) संध्याकाळी अचनक स्फोट झाला. या स्फोटोत अनेक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बर्फाच्या कारखान्यतील स्फोट इतका भीषण होता की, या घटनेत कारखान्याच्या जवळ असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे.
बर्फाच्या कारखान्यातील बॉयलरमध्ये साठवलेल्या अमोनिया गॅसमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या स्फोटानंतर अमोनिया वायू परिसरात पसरल्याने लोकांचा श्वास घेण्यास त्रास होत आहे.





