अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यात स्फोट; परिसरात भीतीचे वातावरण

Amritsar Blast | अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परदेशात लपलेला गँगस्टर हरप्रीत सिंग याचा खास हस्तक जीवन फौजी याने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हल्ल्याच्या तपासासाठी लष्कराची तुकडीही पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. मात्र पोलिसांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
#WATCH | Punjab: A blast-like noise was heard at Islamabad Police Station in Amritsar today around 3 am. As per Police, no damage or injuries have been reported. Police investigation has begun. pic.twitter.com/MNM42mqHQ5
— ANI (@ANI) December 17, 2024
दरम्यान, इस्लामाबाद पोलिस स्टेशन निवासी भागात आहे. पहाटे 3:15 वाजता पोलीस ठाण्याच्या आत झोपलेले चार पोलीस कर्मचारी जागे झाले आणि त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. स्फोटानंतर आसपासचे लोक परिस्थितीची विचारपूस करण्यासाठी खाली आले असता पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा स्फोट झाला नसल्याचे सांगितले. मात्र स्फोटानंतर पोलिस ठाण्यासमोरील घरांच्या काचाही फुटल्या असल्याचे दिसले.
यापूर्वीही झाले असे हल्ले
24 नोव्हेंबर रोजी अजनाळा पोलिस ठाण्याच्या बाहेर आयईडी पेरण्यात आला होता, मात्र त्याचा स्फोट झाला नाही. याची जबाबदारीही हॅप्पी पशिया आणि गोपी नवांशहरिया या दहशतवाद्यांनी घेतली होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी गुरबक्ष चौकी येथे स्फोट झाला. यावेळी हँडग्रेनेड फेकल्याची बाब समोर आली होती. तर 4 डिसेंबर रोजी मजिठा पोलीस ठाण्यात स्फोट झाला होता. त्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान समर्थक दहशतवादी हॅप्पी पासिया याने घेतली होती.
हेही वाचा:





