काळी जादू अन्.. चोंधें कुटुंबाचा ‘तो’ चेहरा समोर; सासरच्यांकडून सुनेचा छळ, पतीने तर हद्दच पार केली…

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि हादरवरून टाकणाऱ्या घडामोडी एकामागून एक समोर येत आहेत. पोलिसांनी वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या आरोपांवर तिचे सासरे, पती, दीर, सासू आणि नणंद यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पोलिसांंनी २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देले आहेत. अशातच वैष्णवीच्या सासरा आणि दीराला थार गाडी दिलेल्या चोंधे बंधूंचे काळे कारनामे उघड झाले आहेत. सुयश चोंधे यांच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत.
राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे फरार असताना ते थार गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. ही थार गाडी पोलिसांनी कारवाईत जप्त केली असून, ही गाडी देणारे सुयश चोंधे आणि त्याचा भाऊ संकेत चोंधे यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. अशातच सुयशच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुयश याच्या पत्नीने दीरावर छळ केल्याचा आरोप केला आहे. वीस लाख हुड्यांसाठी तिचा छळ करण्यात आल्याचे तिने सांगितले आहे. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा प्रयत्नही केला होता. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. तिने महिला आयोगाकडे देखील या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पण कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तिने केला आहे.
पोलिसांनी चोंधे कुटुंबीयांकडून छळ होत असल्याच्या सुयशच्या पत्नीच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांत गुन्हा दाखल होता. मात्र, कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे हगवणे पिता पुत्राच्या सोबतच्या संबंधांचा फायदा चोंधे बंधूंने घेतला असल्याचा चर्चा होत आहेत.
चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप
चोंधे कुटुंबातील सुनेने कुंटुंबावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते असा आरोप तिने सासूवर केला आहे. तर लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला होता आणि दोन तोळं सोनंही दिलं होतं. तरीही लग्नानंतर पैशांची मागणी वारंवार वाढत गेली. त्यातून मारहाण करण्यात येत होती, असे तिने सुयशच्य पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. नवरा अश्वील व्हिडिओ दाखवून शरीरसंबंध ठेवायचा आणि तसेच नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे असा देखील आरोप तिने केला आहे.
…अखेर गुन्हा दाखल
वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे यांना मदत केल्याप्रकरणी चोंधे बंधूंची बावधन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुयश चोंधे याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि २७ मे रोजी अदखपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सुयशच्या पत्नीने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.





