Pune News : ५० महिलांना साड्यांची भेट, चिमुकल्यांसोबत दिवाळी; भाजप युवा मोर्चाचा सामाजिक उपक्रम चर्चेत!
Pune News : दिवाळीचा खरा आनंद स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील उपेक्षित आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा अनोखा सामाजिक आदर्श भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) घालून दिला आहे.

Pune News : दिवाळीचा खरा आनंद हा केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यात आहे, हा सामाजिक संदेश देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपळी येथील इंदिरानगर परिसरात ‘पालावर दिवाळी’ हा अनोखा सामाजिक उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. (Pune News)
भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात परिसरातील ५० महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. (Pune News)
समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे आणि लहान मुलांच्या बालपणात सणाचा आनंद निर्माण व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. (Pune News)
यावेळी बोलताना वैभव सोलनकर म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक पद्धती आहेत; मात्र एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करून त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हाच खरा उत्सव आहे. (Pune News)
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचवणे हीच आमची सामाजिक बांधिलकी आहे. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद समाजासोबत साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” (Pune News)
या उपक्रमामुळे इंदिरानगर परिसरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. (Pune News)
यावेळी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस विवेक साळुंके, उपाध्यक्ष संदीप केसकर, युवा नेते मनोज पिंगळे, सुरंजन पिंगळे, पप्पू सोलंकर,ज्ञानदेव खामगळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “दिवाळीचा खरा प्रकाश दिव्यांमध्ये नसतो, तर तो दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या कृतीमध्ये असतो,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. (Pune News)





