भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची विस्तारित कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड

जामखेड – आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटीच्या सदस्यपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा राम शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आली निवडीबद्दल शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दि ०२ रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महत्वाची बैठकी आयोजित करण्यात आली होती या बैठीकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते.
यावेळी आगामी सर्व निवडणुकांसाठी व युव्हरचना आखण्यासाठी राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी नेमण्यात आली या कोअर कमिटी मध्ये माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष .राम शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील कार्य,नियोजन, दौरे,यात्रा,प्रचार,प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे यासाठी ही समिती कार्य करते याआधी नगर जिल्ह्यातून या समितीवर भाजपाचे दिवंगत नेते सूर्यभान वहाडणे,व ना. स.फरांदे यांनी काम केले आहे यानंतर पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला राम शिंदे यांच्या रूपाने या विस्तारित कोअर कमिटी वर सदस्य म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी मिळाल्याने भाजपा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे .प्रा राम शिंदे याना पक्षाने दिलेल्या गोवा येथील विधानसभा निवडणुकीची ही जबाबदारी कार्यकौशल्याने अतिशय जबाबदारी व नेटाने पार पाडली होती असून त्यांच्या नक्कीच त्यांना दिलेल्या मतदारसंघात निकालाच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसणार आहे
‘भाजपा कोअर कमिटी सदस्य म्हणून निवड करून, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत खूप मोठी जबाबदारी दिली आहे. सदस्य म्हणून चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.’ – प्रा.राम शिंदे माजीमंत्री





