ओल्या दुष्काळावर भाजपाची भूमिका अस्पष्ट ? ओला दुष्काळ घोषणेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टाळाटाळ

प्रभात वृत्तसेवा
पुणे : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनापत्रकारांनी सोमवारी प्रश्न विचारला असता, त्यांनी आभार मानले आणि ते निघून गेले. पुणे भेटीवरील चव्हाण यांना पुन्हा-पुन्हा हा प्रश्न विचारला असता उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही आपल्या परीने मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जमा मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात येईल.केंद्र सरकारही लवकरच पूरग्रस्तांना मदत करेल. राज्यातील पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतीसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.





