Mumbai Mayor News: मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर; रितू तावडे महापौरपदी आज विराजमान होणार
Mumbai Mayor News : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे.

Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 44 वर्षांनंतर आज भाजपचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार आहे. यापूर्वी १९८२मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी पद भूषवले होते.
त्यानंतर आता भाजपाच्या रितू तावडे यांची महापौर पदासाठी आणि शिंदेसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड होणार आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. महापौर निवडीनंतर तब्बल १ हजार ४३४ दिवस महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
रितू तावडे या पूर्व उपनगरातून तर संजय घाडी हे पश्चिम उपनगरातून निवडून आले असल्याने सत्ताधाऱ्यांनी मुंबईच्या दोन्ही उपनगरांना सत्तेत समान प्रतिनिधित्व दिले आहे.
दरम्यान, भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने साहजिकच त्या पक्षाचा महापौरपदावर दावा होता, तर हे पद आपल्याला मिळावे, असा शिंदेसेनेचा आग्रह होता. मात्र, भाजपाच्या संख्याबळापुढे अखेर त्यांना मान झुकवावी लागली. तर दोन्ही राष्ट्रवादींनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचे संख्याबळ ३३ झाले आहे.
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा पालिका मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या निवडणुकीस काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या विरोधी बाकांवरील नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत. Mumbai Mayor News
भाजप शिंदेसेनेच्या युतीने पालिकेवर झेंडा फडकावला
यापूर्वी 1982मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर भाजपला हे पद मिळाले आहे. वर्ष 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र होते, पण नंतर या पक्षांमध्ये काडीमोड झाला. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने पालिकेवर झेंडा फडकावला आहे. Mumbai Mayor News:
ही निवडणूक ‘महापौर हिंदू मराठी की मराठी’ या मुद्यावरून चांगलीच गाजली. सुरुवातीला भाजपने ‘हिंदू मराठी’ महापौराची भूमिका घेतली होती, तर उद्धवसेनेने ‘मराठीच महापौर’ यावर भर दिला होता. पुढे भाजपनेही मराठी महापौराचाच प्रचार केला. Mumbai Mayor News:
संख्याबळ किती?
भाजपा – ८९, शिंदेसेना – २९, उद्धवसेना – ६५, काँग्रेस – २४, एमआयएम – ८, मनसे – ६, राष्ट्र्रवादी (अप) – ३, समाजवादी पक्ष – २, राष्ट्रवादी (शप) – १
हेही वाचा:
Pimpri News : स्थायीच्या अध्यक्षपदासाठी देव पाण्यात; नगरसेवकांमध्ये चुरस






