Kerala Legislative Assembly : केरळसाठी भाजपकडून मास्टरप्लॅन! ‘या’ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार
Kerala Legislative Assembly : दक्षिणेकडील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे.

Kerala Legislative Assembly : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 मार्च 2026 रोजी केली. यामध्ये आसाम, केरळ, पुदुच्चेरी (केंद्रशासित प्रदेश), तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून केरळ राज्यात ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या दृष्टीने रणनिती आखली जात आहे.
केरळ राज्यात विधानसभेच्या 140 जागा आहेत. निवडणुक आयोगाने पाच राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळ ही दोन महत्वाची राज्ये आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे या राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे.
केरळमध्ये सध्या Left Democratic Front (LDF) ची सत्ता आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत. ते 2016 पासून केरळचे मुख्यमंत्री आहेत आणि 2021 च्या निवडणुकीत LDF ने पुन्हा बहुमत मिळवले, त्यामुळे ते दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. LDF च्या विधानसभेत 97 जागा आहेत. त्यामुळे भाजपची केरळ राज्यात सत्ता आणण्याठीची शक्यता दुसर दिसत असून निवडणुकीत मोठा कस लागणार असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : Eid Wishes: ईदच्या शुभेच्छांचा खास अंदाज; गोड शब्दांनी नात्यांत वाढवा आपुलकी
असे असले तरी केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसह इतर वरिष्ठ नेते या राज्य दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा वादळी दौरा Kerala Legislative Assembly

PM Modi
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील प्रमुख जिल्ह्यांचे वादळी दौरे करणार असून, आयोजित करण्यात येणाऱ्या सभांना संबोधित करून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करतील. भाजपची निवडणूक रणनीती कासारगोड, पालक्काड, तिरुवनंतपुरम, कोल्लम आणि त्रिशूर यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये व्यापक संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
स्थानिक मुद्दे आणि विकासावर फोकस Kerala Legislative Assembly
अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांचा त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी तब्बल 70,000 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे.
भाजपसाठी हे यश महत्वाचे असून, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत भाजपकडून स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोणते राजकीय डावपेच खेळले जातात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





