Jammu Kashmir BJP List: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली तिसरी यादी, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 29 उमेदवारांची घोषणा

Jammu Kashmir BJP List: भारतीय जनता पक्षाने (भाजप) जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसऱ्या टप्प्यातील 10 तर तिसऱ्या टप्प्यातील 19 उमेदवारांची नावे आहेत. याआधी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने पहिल्या यादीत 15 तर दुसऱ्या यादीत एका उमेदवाराची घोषणा केली होती. आज भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे. याआधीही भाजपने 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती जी कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आली होती.
भाजपा की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी जम्मू व कश्मीर विधानसभा चुनाव 2024 के लिए अपनी तीसरी सूची में निम्नलिखित नामों पर स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/YcZT9DJBmG
— BJP (@BJP4India) August 27, 2024
उमेदवारांची नावे –
भाजपने नगरोटामधून देविंदरसिंग राणा, हब्बाकडलमधून अशोक भट्ट, गुलाबगडमधून मोहम्मद अक्रम चौधरी, रियासीमधून कुलदीप राज दुबे, श्री माता वैष्णो देवीमधून बलदेव राज शर्मा, कालाकोट सुंदरबनीमधून ठाकूर रणधीर सिंग, बुधलमधून चौधरी झुल्फिकार अली, थन्नामंडी येथून मोहम्मद इक्बाल मलिक, सरनकोटमधून सय्यद मुश्ताक अहमद बुखारी आणि पूंछ हवेलीतून चौधरी अब्दुल गनी यांना तिकीट देण्यात आले आहे.
मेंढरमधून मुर्तझा खान, उधमपूर पश्चिमेतून पवन गुप्ता, रामनगरमधून सुनील भारद्वाज, बानीमधून जीवन लाल, बिल्लावारमधून सतीश शर्मा, जसरोटामधून राजीव जसरोटिया, जम्मू पूर्वमधून युधवीर सेठी, जम्मू पश्चिममधून अरविंद गुप्ता, जम्मू उत्तरमधून शाम लाल शर्मा, अखनूरमधून मोहन लाल भगत आणि छम्बमधून राजीव शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 24 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.





