#BudgetSession ‘दाऊदच्या दलालमंत्र्याचा राजीनामा घ्या BJPचं आंदोलन’
Updated On:

मुंबई – मलिक यांना मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाकडून अटक झाल्यानंतर त्यांच्या मागणी राजीनाम्याची भाजप नेत्यांकडून करण्यात येऊ लागली आहे. आज महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आजपासून सुरु होत आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे.दाऊद के दलालो को जुते मारो, देश के गद्दारो को जुते मारो अशा घोषणा देत विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपने आंदोलन केलं. या आंदोलनात निलंबित झालेल्या आमदारांपैकी योगेश कुटे, आशिष शेलार, संजय कुटे, पराग अळवणी हे देखील सहभागी झाले होते.





