भाजप कार्यकर्त्यांचाच पक्ष नेत्यावर हल्ला; कोलकाता पक्ष मुख्यालयातील प्रकार

कोलकाता – भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश मुख्यालयातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका नेत्यावर हल्ला करून त्याला बेदम चोप दिला. या प्रकरणी भाजपने पक्षाच्या दहा जणांना कारणेदाखवा नोटीस जारी केली आहे. येत्या आठवडाभरात त्यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे असे त्यांनी सांगण्यात आले आहे.
भाजपचे दक्षिण कोलकाता प्रमुख शंकर सिकदर यांनी भाजप कार्यकर्त्यांना ही नोटीस जारी केली आहे. भाजपचे पदाधिकारी गंगाधर चॅटर्जी आणि तनुजा चॅटर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली व त्यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या हल्लेखोर कार्यकर्त्यांच्या विरोधात नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. निवडणुक निकालानंतर अन्यत्रही असेच प्रकार घडले आहेत. पण हा प्रकार पक्षाच्या मुख्यालयातच घडल्याने त्याप्रकरणात नोटीसा जारी केल्या गेल्या आहेत.





