Harshvardhan Sapkal : भाजप देशात नवं संविधान आणणार; काँग्रेसचा खळबळजनक दावा

Harshvardhan Sapkal । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तिशः पक्ष संदर्भात आणि विचारधारेशी संबंधित भारताचं संविधान मान्य नाही. त्यामुळं संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु केली असून 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरु असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी 2034 झाली देशात नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठकाही सुरु झाल्या असल्याचा दावा आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चौफेर टीकाही केली आहे. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान राहूनही मोदींनी सांगण्यासारखं काहीचं केलं नसल्याने काल त्यांनी आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. भ्रम पसरवणे, काँग्रेसला बदनाम करणं एवढेच मोदींनी सुरु केलं आहे. पंतप्रधानांचा असं वर्तन हे अशोभनीय असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थेट सन्मानाचे कायदामंत्रीपद दिलं होतं, हे मोदींनी विसरु नये असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दर्शन घेऊ दिलं नाही हे दुर्दैव आहे. दलित ओबीसी आणि काँग्रेसमध्ये मोदी दरी निर्माण करु बघत आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांना मोदी फॅसिस्ट करत आहेत. आरएसएस जनसंघ व आजच्या भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केलं आहे. मनुस्मृतिद्वारे संविधान लिहिलं जावं व मनुस्मृतिद्वारे संविधान चालावं असं गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं “बंच ऑफ थॉट” हे भाजपच ” बायबल ” आहे, असा टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.





