राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार
Updated On:

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे सर्व उमेदवार अजिबात निराश नसून, पुढील स्थायिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला देखील लागले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीये. भाजपच्या ५९ पराभूत उमेदवारांची शनिवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणले कि भाजपचे पराभूत झालेले सर्वच्या सर्व उमदेवार दुसऱ्या क्रमणकावर आहेत. त्यामुळे ज्याकाही थोड्याफार उणीव राहिल्यात त्यावर आज सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन करत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.





