भास्कर जाधवांच्या नावाला भाजप-शिवसेनेचा विरोध? विरोधी पक्षनेता पदासाठी अडचण होण्याची शक्यता

Bhaskar Jadhav | विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवार यांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मात्र जरी विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचे निश्चित झाले असले तरी त्यांना भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता आहे. Bhaskar Jadhav |
भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता
महाविकास आघाडी सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते. तेव्हा भास्कर जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं. शिवसेना फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर टोकाची टीका केली होती. त्यामुळे जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत दिसून येत आहेत. मात्र महाराष्ट्रातही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाचे संख्या बळ नाही. मात्र याबाबत विधानसभा अध्यक्षांकडून भाजप व शिवसेनेसोबत चर्चेची शक्यता आहे. Bhaskar Jadhav |
भास्कर जाधव यांची राजकीय कारकिर्द
विरोधी पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे 4 डिसेंबर 2024 पासून हे पद रिक्त आहे. मात्र, आता या पदासाठी शिवसेना ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. Bhaskar Jadhav |
जाधव यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषविली आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले जाधव एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.
हेही वाचा:
धनंजय मुंडेंनंतर महायुतीला दुसरा धक्का बसणार? कोकाटेंचा फैसला कोर्टाच्या निकालावर अवलंबून





