युती होणारचं! खासदार संजय राऊत ठाम

मुंबई: विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आता मैदानात उडी घेतली आहे. मात्र पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली ती शिवसेना-भाजप युतीची. यावर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, नानार आणि आरे’चा शिवसेना-भाजप युतीशी संबंध नाही. तो पर्यावरणाचा मुद्दा आहे. युतीसंदर्भात विचारले असता राऊत पत्रकारांना म्हणाले “तुम्हाला कोणी सांगितले युती होणार नाही. जर पक्षाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ५०-५० फार्मुला ठरला आहे. तर कोणी काहीही बोलो भाजप-शिवसेना सोबत लढणार.

Leave A Reply

Your email address will not be published.