पुणे, – शिवाजीनगरचा गड राखण्यात भाजपला यश आले आहे. विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. यावेळी तब्बल ३६ हजार ८१४ मतांनी विजय मिळविला आहे. मागील वेळी (२०१९) ५ हजार १२४ मतांनी विजय मिळविला होता.त्यावेळी वंचितला १० हजारहून अधिक मते मिळाली होती. मात्र, यावेळी विजयाच्या मताधिक्यात घसघशीत वाढ झाली आहे. शिरोळे यांना ८४ हजार ६८५ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ४७ हजार ८७१ मते मिळाली. त्यांची मते मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहेत. त्यांना मागील वेळी ५३ हजार ६०३ मते मिळाली. खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना १२ हजार ८७६ इतकी मते मिळाली. महायुतीच्या कल्याणकारी योजना, आत्तापर्यंत केलेली विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क यामुळे ऐतिहासीक विजय मिळवला आहे. येत्या काळात कामाला गती देणार आहे. मतदार संघातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल. शिवाजीनगर मतदार संघ विकासाचे स्मार्ट मॉडल बनवणार आहे. सिद्धार्थ शिरोळे, विजयी उमेदवार, शिवाजीनगर मतदारसंघ