‘भाजपच्या लोकांनी माढा मतदार संघात बनावट नोटा वाटल्या’; उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
Updated On:

Uttam Jankar | Maharashtra | BJP – भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी माढा मतदार संघात ३५ कोटी रूपयांच्या बनावट नोटा वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की भाजपचे लोकच बनावट असल्याने त्यांनी हा बनावट नोटा वाटण्याचा प्रकार केला आहे, पण माळशीरस तालुक्यातील कोणताही दुकानदार या नोटा लोकांकडून स्वीकारण्यास तयार नाही असे ते म्हणाले.
मतदारांनी या नोटा दुकानदारांना दाखवून त्या खऱ्या आहेत की खोट्या याची शहानिशा करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपावर भाजपकडून अजून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
या मतदार संघात विद्यमान भाजप खासदार निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत हेात आहे.





