Mahesh Landage : भाजप आमदार महेश लांडगे कडाडले! अजित पवारांना दिलं आव्हान?; म्हणाले “गोरक्षण करणे म्हणजे…”

Mahesh Landage : इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेत शाब्दिक प्रहार केला आहे.
यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात आता आणखी एका नव्या मुद्याची भर पडली आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ‘गोरक्षकांना आवर घाला…’ अशा सूचना पोलीस प्रशासनाला केल्या होत्या. यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर दिसून येत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
गोरक्षण करणे म्हणजे…
यानंतर इंदापूर येथील आंदोलनात आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही, अशा शब्दांत लांडगेंनी प्रहार केला आहे.
बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये.
एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो ‘गोरक्षक आमचं नुकसान करतात’. त्यांना काय अडचण आहे? जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचं कारण नाही.
हेही वाचा : राजस्थान उच्च न्यायालयाचीही भटक्या कुत्र्यांबाबत कडक भूमिका ; विशेष मोहीम चालवण्याचे दिले निर्देश





