Maharashtra : भाजप 110 ते 115 जागा जिंकणार अन् 23 नोव्हेंबरला पुन्हा दिवाळी साजरी होणार, BJPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा…

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले असून आता अर्ज मागे घेण्याकरता घोडेबाजार सुरू आहे. नाराजांची नाराजी दूर करण्याचे आणि बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुरू असून येत्या 4 तारखेला कोण अर्ज मागे घेतंय हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान भाजपच्या एका बड्या नेत्याने विधानसभेत भाजपाचे किती आमदार निवडून येणार याचा थेट आकडाच सांगितला आहे. एकट्या भाजपाला इतक्या जागांवर आघाडी मिळेल असा दावा त्या नेत्याने केला आहे. तो मोठा नेता म्हणजे भाजप नेते मोहित कंबोज हे असून त्यांनी यासंदर्भात एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे.
BJP Maharashtra Individual number of winning will be around 110-115 out of 152 !
Diwali 🪔again will be celebrated on 23 November at @BJP4Maharashtra Office !
Wishing all a #HappyDiwali today !
People of #Maharashtra has decided to give clear mandate for development to #BJP .— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) October 31, 2024
मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, ” भाजप 152 पैकी 110 ते 115 जागांवर विजयी होईल आणि भाजप प्रदेश कार्यालयात (BJP4Maharashtra) 23 नोव्हेंबरला पुन्हा दिवाळी साजरी होईल”. असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाच्या विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्यातील जनता आम्हाला बहुमत देईल, असा विश्वास देखील दिवाळीच्या शुभेच्छा देताना कंबोज यांनी व्यक्त केला. दरम्यान, निवडणुकीआधीच मोहित कंबोज यांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या असल्या तरी आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे 23 नोव्हेंबरलाच समोर येईल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवामधून धडा घेत भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सावधपणे पाऊल टाकलं जात आहेत. आतापर्यंत महायुतीमध्ये भाजपने 152 जणांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे सेनेला 85 जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळाल्या आहेत. तर मित्रपक्षांना 7 जागा जाहीर झाल्या आहेत. रिपाइं,जनसुराज्यला 2-2 जागा राजश्री शाहू आघाडी,युवा स्वाभिमानी आणि रासपला प्रत्येकी एकेक जागा दिल्या आहेत.





