भाजपचे नेते दहशदवाद्यांच्या निशाण्यावर ; 23 जणांची हत्या

श्रीनगर – देशातील काही भाग सोडला तर उर्वरित भागात भारतीय जनता पार्टी, म्हणजेच भाजप चे शासन आहे. सध्या केंद्रात त्यांची सत्ता आहे.

मात्र जम्मू -काश्मीरमधील भारतीय जनता पक्षाचे नेते भयभीत झाले आहेत. दहशतवादी सतत खोऱ्यात भाजप नेत्यांना लक्ष्य करत आहेत. कलम 370 रद्द केल्यापासून भाजपचे एकूण 23 नेते दहशतवाद्यांनी ठार केले आहेत. भाजप नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढली आहे.

मंगळवारीच सायंकाळी 4.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी जावेद अहमद दार यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली. जावेद कुलगामच्या ब्रजलू जागीर भागात राहत होते.

गेल्या 24 महिन्यापासून दहशतवाद्यांनी 23 नेत्यांची हत्या केली आहे. त्याच वेळी, एकट्या कुलगाम जिल्ह्यात, गेल्या एका वर्षात 9 नेत्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

त्यापैकी काही पक्षाचे मोठे नेते देखील आहेत, ज्यांना विस्तृत आधार होता, असे जम्मू काश्मीरमधील भाजपचे नेते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद अहमद दार, किंवा कोणीही किंवा स्थानिक भाजप नेत्याने त्यांच्यासाठी पोलीस संरक्षण मागितले नव्हते.

तसेच सुरक्षा मिळवणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केलेले नाही. पोलीस सूत्रांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात 100 पेक्षा जास्त भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना राज्य पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.

यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि पहिल्या क्रमांकाच्या नेत्यांचा समावेश आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्ता सुरक्षेपासून वंचित आहेत आणि दहशतवादी त्यांना सतत लक्ष्य करत आहेत.

 

भाजप नेत्यांची हत्या ही चिंतेची बाब
भाजप कार्यकर्त्यांची सातत्याने होणारी हत्या ही गंभीर चिंतेची बाब आहे. जावेद दार यांच्या हत्येचा निषेध कर अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे की, दहशतवादी निराशेमुळे निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहेत.

निशस्त्र लोकांना मारून दहशतवाद्यांना काहीही मिळणार नाही. त्यांनी दहशतवादी हल्ल्याला बर्बर आणि भ्याड कृत्य म्हटले आहे. त्याने सर्वात कठोर शिक्षेचे आवाहनही केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.