bjp leader son : सोशल मीडियासाठी रील बनवताना स्टंट करणं एका १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात नमिष संगलद या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून तो भाजप नेते विरेश संगलद यांचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, नमिष हा मैसूर येथे नववीत शिक्षण घेत होता. उगादी सणानिमित्त तो हुबळी येथे आला होता. यावेळी मित्रांसोबत इन्स्टाग्राम रील शूट करताना ही दुर्घटना घडली. नमिष स्कूटर चालवत होता, तर त्याच्याच वयाचा दुसरा मुलगा कार चालवत होता. त्यांच्या मित्रांकडून व्हिडिओ शूटिंग सुरू असतानाच दोन्ही वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की नमिष सुमारे २० फूट हवेत फेकला गेला. गंभीर जखमी अवस्थेत नमिषला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, स्टंट करताना अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडला. दोन्ही मुलं एकमेकांचे मित्र असल्याची माहितीही त्यांनी दिली. कायदेशीर कारवाईचा इशारा Bjp Leader Son bjp leader son पोलिसांनी अशा प्रकारच्या धोकादायक स्टंट्स आणि रील्स बनवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.Bjp Leader Son