भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

Bjp leader Ravi shankar prasad। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील घरी आग लागली. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचे घर २१, मदर टेरेसा क्रेसेंट रोड, दिल्ली याठिकाणी आहे.
आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वृत्त आहे. मात्र, नुकसानीचे प्रमाण अद्याप कळलेले नाही. त्यांच्या घरातील एका खोलीत आग लागली. त्यावेळी खोलीत कोणीही उपस्थित नव्हते.
#WATCH | Delhi | Fire tenders and Delhi Police Forensics Team at the spot after a fire broke out at BJP MP Ravi Shankar Prasad’s residence. Further details awaited. pic.twitter.com/HwkhCw98gI
— ANI (@ANI) January 14, 2026
अग्निशमन दलासह, फॉरेन्सिक टीम देखील त्यांच्या घरी पोहोचली आहे. Bjp leader Ravi shankar prasad।
सकाळी ८:०३ वाजता अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचेही अग्निशमन दलाने सांगितले.





