‘मुख्यमंत्रीपदापायी मती गेली मतीविना हिंदुत्वनीती गेली नीतीविना जनता गेली’

मुंबई – ‘मुख्यमंत्रीपदापायी मती गेली मतीविना हिंदुत्वनीती गेली नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले’ अस ट्विट करत भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.’
दरम्यान, शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. या आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
केशव उपाध्ये यांचे ट्विट
मुख्यमंत्रीपदापायी मती गेली
मतीविना हिंदुत्वनीती गेली
नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले
सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला
इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 9, 2022





