कणकवली : भाजपचे कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काय म्हणाले नितेश राणे? “बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता-भगिनी आणि बांधवांची काळजी जिहाद हृदय सम्राट असलेल्या उद्धव ठाकरेच्या प्रवक्त्याला वाटणं हे हास्यास्पद आहे. ह्यांचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडणून आले आहेत. निवडणुकीवेळी त्याने मुल्ला सोबत जेवढा वेळ घालवला त्यातला एक टक्का वेळ देऊळ आणि साधू संतांना दिला नाही. ह्याच्या पेक्षा नालायक कोणी नाही. हा गोधडित असताना RSS भाजप, हिंदू समाजाची सुरक्षा आणि काळजी घेत होते. जेवढी काळजी RSS घेत आहे, त्यातली एक टक्का देखील काळजी ह्याचा मालक करत नाही” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. बांगलादेश मधील परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षा मोदींनी चांगल्या प्रकारे हाताळली. मोदी साहेबांमुळे जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे. भांडूपमध्ये बसून आंतराष्ट्रीय पातळीची चिंता करु नको. मुंबईला बांगलादेश करण्याचे कारस्थान ह्याचा मालक करत आहे. बांगलादेशींना आश्रय देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलय. या हिरव्या सापांना दूध पाजण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलय. त्या जिहादींना आवर अन्यथा एक दिवस ठेचून मारू” अशा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी टीका केली आहे.