BJP Leader : भाजपला सर्वात मोठा धक्का; ‘हे’ दोन बडे नेते पक्षाची साथ सोडणार?
BJP Leader : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापू लागले असून, पश्चिम उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.

BJP Leader : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली या जिल्ह्यांमध्ये काही बडे नेते समाजवादी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यामध्ये भाजपमधील काही नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. (BJP Leader)
तिकीट वाटपावरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असलेल्या नेत्यांकडून पर्यायी राजकीय मार्गांचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, समाजवादी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारीबाबत स्पष्ट आश्वासन मिळावे, अशी काही इच्छुकांची भूमिका असल्याचे समजते. (BJP Leader)
साहब सिंग सैनी पुन्हा समाजवादी पक्षात जाणार?
अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये मंत्री आणि विधान परिषद सदस्य राहिलेले साहब सिंग सैनी २०२३ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. आता ते पुन्हा समाजवादी पक्षात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सैनी समाजातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. (BJP Leader)
मजिद अली यांच्या भूमिकेकडे लक्ष
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूरमधून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले मजिद अली हेही पक्षांतराच्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवबंदचे माजी आमदार माविया अली यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्याची माहिती आहे. समर्थकांशी चर्चा करून ते पुढील राजकीय निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (BJP Leader)
चौधरी नीरपाल यांच्या भूमिकेचीही चर्चा
आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेले चौधरी नीरपाल हे राष्ट्रीय लोकदलाच्या क्रीडा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ते समाजवादी पक्षाशी संबंधित होते. त्यांच्या संभाव्य घरवापसीमुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे. (BJP Leader)
उमेदवारीवरून देवबंद आणि नकुडमध्ये पेच
सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद आणि नकुड या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. (BJP Leader)
देवबंद : माविया अली आणि मजिद अली या दोघांचीही उमेदवारीसाठी नावे चर्चेत आहेत. माविया अली यांनी समाजवादी पक्षात नव्या नेत्यांना जोडण्यात भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. तर बसपातून समाजवादी पक्षात येण्याची चर्चा असलेले मजिद अली यांनाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (BJP Leader)
नकुड : डॉ. धर्मसिंग सैनी आणि साहिल खान यांच्यात उमेदवारीवरून स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये भाजप सोडून समाजवादी पक्षात आलेल्या डॉ. धर्मसिंग सैनी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर साहिल खान यांनी बसपात प्रवेश केला होता. आता साहिल खान पुन्हा नकुडमध्ये सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे. (BJP Leader)
अखिलेश यादव यांच्यासमोर दुहेरी आव्हान
पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नशील असताना त्यांच्यासमोर दोन महत्त्वाची आव्हाने आहेत. बाहेरून पक्षात येणाऱ्या नेत्यांना सामावून घेताना जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे, हे पहिले आव्हान आहे. (BJP Leader)
दुसरीकडे, नव्याने पक्षात येणारे नेते उमेदवारीबाबत ठोस आश्वासनाची अपेक्षा करत असल्याची चर्चा आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे नेतृत्व सध्या कोणतीही पूर्वअट न ठेवता नव्या नेत्यांना पक्षात सामावून घेण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. (BJP Leader)
त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार का आणि भाजपमधील नाराज नेते खरोखरच पक्षांतर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BJP Leader)




