“रस्त्यावरील खड्डयांना भाजपच जबाबदार”; भाजपवर आरोप करत राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : गेल्या पाच वर्षात शहरात भाजपची सत्ता होती या कालावधीत शहराच्या विकासकामांची आणि रस्त्यांची वाताहत झाली असून त्यामुळेच पुणेकरांना खड्डयांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी, रस्त्यावर साचलेल्या खड्डयात कागदी होडया आणि माशांच्या प्रतिकृती सोडत अभिनव आंदोलन करण्यात आले आहे. खड्ड्यांजवळ बसून मासे, खेकडे पकडत अभिनव आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख,संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, श्वेता होनराव, अमोल ननावरे, संजय दामोदरे, विजय बगाडे, सोनाली उजागरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, योगेश पवार, मंथन जागडे,अर्जुन गांजे, आनंद बाफना, दिनेश खराडे बाळासाहेब अटल, रुपेश आखाडे, मोहसीन काझी, गणेश दामोदरे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, सचिन गांधी, नामदेव पवार, अर्जुन भिसे, संतोष पिसाळ, समीर पवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते जर दरवर्षी पावसाळ्यात दुरुस्त करावे लागत असतील. तर 5 वर्षात भाजपने केलेल्या रस्त्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे , मणक्याचे आजार होत आहेत. काही अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे या खड्डयांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यासाठी पाच वर्षातील सत्ताधारी भाजपमधील पदाधिकारी, या रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी, या रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.





