“भाजपकडे दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही, पंतप्रधानांना कोणावरीही…”; आतिशी यांची बोचरी टीका

Delhi News | दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही भाजपला मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेता आलेला नाही. यावरून आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि दिल्लीच्या काळजीवाहु मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अतिशी ?
सोमवारी पत्रकार परिषदेत अतिशीने म्हणाल्या की, “दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. 8 फेब्रुवारी रोजी निकाल लागला होता, दिल्लीतील लोकांना आशा होती की भारतीय जनता पक्ष 9 तारखेला मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित होईल आणि 10 तारखेला दिवशी शपथविधी घेतली जाईल. त्यानंतर दिल्लीचे काम सुरू होईल, परंतु दिल्लीतील लोक अद्यापही प्रतिक्षा करत आहेत.”
“भाजपकडे दिल्लीत सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा एकही चेहरा नाही, हे यावरून सिद्ध होते. पंतप्रधानांना ४८ आमदारांपैकी कोणत्याही आमदारावर विश्वास नाही, हे आज स्पष्ट झाले आहे. भाजप आमदारांमध्ये सरकार चालवण्याची क्षमता नाही. त्यांचे एकमेव काम दिल्लीचे पैसे लुटणे आणि वाटणे आहे,” अशी बोचरी टीका आतिशी यांनी केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “भाजपकडे दिल्लीसाठी कोणतेही व्हिजन आणि योजना नाही. ते सरकार चालवू शकत नाही. निवडणुकीनंतर लगेचच जनतेसमोर आलेले हे कटू सत्य आहे. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत वीज कपात झाली नाही. ८ फेब्रुवारीनंतर अनेक भागात ४ ते ५ तास वीज कपात होऊ लागली आहे. भाजपच्या लोकांनी आधी ठरवावे की त्यांना काय म्हणायचे आहे? सध्या सत्य हे आहे की भाजप आणि त्यांचे उप राज्यपाल विनय सक्सेना सध्या वीज व्यवस्था हाताळण्यास सक्षम नाहीत.”
दरम्यान, दिल्लीत विधानसभा निवडणुकासाठी 5 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात 70 जागांसाठी मतदान करण्यात आले. त्याचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी लागला. निकालामध्ये, भाजप बहुमत मिळवत 27 वर्षानंतर दिल्लीत सत्तेत परतला.
हेही वाचा:
‘चीन आपला शत्रू नाही’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद, भाजपकडून जोरदार टीका





