Maharashtra Election : भाजपने लावली फिल्डिंग ! अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी ‘या’ 6 नेत्यांची केली निवड

मुंबई : येत्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. राज्यात महायुती कि महाविकास आघाडी? कोणाची सत्ता येणार? अपक्ष उमेदवारांचे काय होणार ? हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र त्यागओदरच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विधानसभेच्या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता भाजपने अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून या कामगिरीसाठी 6 नेत्यांची निवड केली आहे. या ६ जणांवर अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी दिली आहे.
‘या’ 6 नेत्यांवर जबाबदारी
मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर भाजपने बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्याची जबाबदारी दिली आहे. अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यात या नेत्यांना यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





