जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्थापन केली समिती, या नेत्यांचा समावेश

Jammu and Kashmir assembly elections 2024 –निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी निवडणूक समिती स्थापन केली आहे. भाजपने या समितीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि जम्मू-काश्मीर नेत्यांना स्थान दिले आहे.
या नेत्यांना समितीत स्थान-
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक समितीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना, खासदार डॉ. जितेंद्र सिंह, खासदार जुगल किशोर शर्मा, राज्यसभा खासदार गुलाम अली खटाना, संघटनेचे सरचिटणीस अशोक कौल, माजी उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह, माजी उपमुख्यमंत्री डॉ. सीएम कविंद्र गुप्ता, सुनील शर्मा, विबोध गुप्ता, डॉ. देविंदर कुमार मन्याल, डॉ. दर्शन अंद्राबी, देविंदर सिंग राणा, अजय भारती आणि संजीता डोगरा यांचा या समितीत समावेश आहे.
विशेष आमंत्रित नेते –
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पक्षाच्या निवडणूक समितीमध्ये केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रभारी जम्मू-काश्मीर तरुण चुग आणि सह-प्रभारी जम्मू-काश्मीर आशिष सूद आणि राष्ट्रीय सचिव डॉ. नरिंदर सिंग हे विशेष निमंत्रित आहेत. यांचा समावेश असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाने दिली आहे.
निवडणूक आणि निकालाची तारीख –
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहे.





