BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांना संधी; पाहा….

Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून, भाजपने आज अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
ज्यामध्ये तब्बल 99 उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली देण्यात आली आहे.
भाजपच्या 13 महिला उमेदवार कोण? पाहा…
– श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
– अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंब्री
– सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
– सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
– मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
– मनीषा अशोक चौधरी – दहिसर
– गोरेगांव – विद्या ठाकूर
– माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
– मोनिका राजीव राजले – शेगाव
– प्रतिभा पचपुते – श्रीगोंदा
– नमिता मुंदडा – केज
– श्वेता महाले – चिखली
– मेघना बोर्डीकर – जिंतूर





