हरियाणा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पंतप्रधान मोदी, शाह आणि योगी यांच्यासह ४० नावांचा समावेश

Haryana BJP Star Campaigners List | हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, सीएम नायब सिंग सैनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह ४० नेत्यांची नावे आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात वर आणि बबिता फोगट यांचे नाव शेवटी समाविष्ट आहे. या यादीचा क्रमाने विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा त्या क्रमाने समावेश करण्यात आला आहे.या यादीत हेमा मालिनी आणि दिया कुमारी यांचीही नावे आहेत.
याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मोहन लाल बडोली, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, सतीश पुनिया, बिप्लव कुमार देव, सुरेंद्र सिंह नागर, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, हरदीप सिंग पुरी. सुधा यादव, भजन लाल शर्मा, मोहन यादव, पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, राव इंद्रजीत सिंग, कृष्णा पाल गुर्जर, वसुंधरा राजे सिंधिया, स्मृती इराणी, जयराम ठाकूर, रवनीत सिंह बिट्टू, अनुराग ठाकूर. कुमारी, हेमा मालिनी, किरण चौधरी, धरमवीर सिंग, नवीन जिंदाल, अशोक तंवर, मनोज तिवारी, संजीव बल्यान, कुलदीप विश्नोई, राम चंदर जांगरा, बबिता फोगट यांच्या नावांचा समावेश आहे.
Haryana BJP Star Campaigners List | हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान होणार
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाबपासून वेगळे होऊन राज्याची निर्मिती झाली. राज्यात विधानसभेच्या 90 जागा आहेत. बहुमतासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला 46 आमदारांचा पाठिंबा लागेल. राज्यातील 90 जागांपैकी 17 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.






