पुणे जिल्हा | जन्मदात्या बापाला मुलाकडून मारहाण
Updated On:

शिक्रापूर, (वार्ताहर)- केंदूर (ता. शिरुर) येथील पऱ्हाडवाडी येथे शेतीच्या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला मारहाण केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश रंगनाथ पऱ्हाड (रा. केंदूर पऱ्हाडवाडी), असे गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे नाव आहे. केंदूर येथे रंगनाथ पऱ्हाड हे त्यांच्या शेतात ट्रक्टरच्या सहाय्याने मशागत करीत असताना त्यांचा मुलगा रमेश शेतात आला.
त्याने वडील रंगनाथ यांना शिवीगाळ, दमदाटी करीत तुम्ही शेतात यायचे नाही. येथे काही करायचे नाही असे म्हणून लाकडी काठीने मारहाण करीत ट्रॅक्टर चालकाला शेतातून हाकलून देऊन वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत रंगनाथ रामचंद्र पऱ्हाड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.





