bird flu : बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली! आता मनुष्यालाही धोका? ‘ही’ लक्षणे आढळली तर डॅाक्टरांकडे जा…अन्यथा….

मुंबईः राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या रोगाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे पशुविभागाकडून राज्यात बर्ड फ्लूचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आता धक्कादायक बाब समोर आली आहे, बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्षी व प्राण्यांमधून त्याचा संसर्ग व्यक्तीलाही होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात….
बर्ड फ्ल्यूचा प्रसार किंवा संसर्ग प्रामुख्याने कोंबड्या, टर्की, मोर किंवा इतर पक्षांमुळे होतो . H5 N1 , H 5N 9 , H 5N 8 या नवीन आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, असे सांगितले जाते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मूत्यू झाला होता. याचे कारण बर्ड फ्यू असल्याचे सांगितले जाते.
तसेच टर्की, मोर आणि कावळे यांचे देखील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्ड फ्ल्यूने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी आता विविध उपाययोजना करण्यासाठी तालुका स्तरावर बर्ड फ्ल्यू प्रतिबंधनासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे.
जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो, अशी माहिती समजते. कोरोनानंतर भारातात आलेल्या बर्ड फ्लूने केरळ राजस्थान मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात हाहाकार दिसून आला. आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढल्याचे चित्र आहे.
लक्षणे काय आहेत?
सतत खोकला आणि उच्च ताप
डोकेदुखी
सतत नाक वाहणे
पचनाच्या तक्रारी (उलट्या , मळमळ , जंत होणे )
घशात सूज येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
डोळे दुखणे
अतिशय थकवा जाणवणे,अशा प्रकारची लक्षणे सुरुवातीला जाणवतात
बर्ड फ्लू होऊ नये यासाठी काय करावे?
बर्ड फ्लू नये संक्रमित होऊ शकतात अशा पक्षांपासून त्यांच्या विष्टेशी किंवा पिसांशी संपर्क टाळावा.
जंगली तसेच पाळीव पक्षांपासून दूर रहावे.
बर्ड फ्लू ची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहणे टाळावे.
१९९७ मध्ये आढळला होता पहिला बर्ड फ्ल्यूबाधित व्यक्ती
जगात पहिल्यांदा १९९७ मध्ये चीनमधील पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली होती. तो सतत पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्यापर्यंत हा विषाणू पोहचला. त्यामुळे बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या पक्षी, कोंबड्या आणि इतर प्राण्यांच्या संपर्कात येणे मनुष्याने टाळले पाहिजे.





