वाढत्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासूचे सडेतोड उत्तर

Bipasha Basu | अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. लेकीसोबतचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र आई झाल्यानंतर तिच्या वाढलेल्या वजनावरुन तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. आता तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
फॉर्मर मिस इंडिया आणि ब्युटी इन्फ्लुन्सर श्वेता विजय नायरने महिलांना आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांविषयी बोलत एक व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओवर बिपाशाने कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं.
बिपाशा बसुने लिहिले की, “मला आशा आहे की लोक नेहमी इतके उथळ आणि खालच्या पातळीवरचे राहणार नाहीत. महिलांनी दररोज निभावलेल्या असंख्य भूमिका लक्षात घेऊन त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं. मी एक सुपर कॉन्फिडेंट स्त्री आहे, जिच्याकडे एक प्रेमळ जोडीदार आणि मजबूत कुटुंब आहे.” सोबतच बिपाशाने श्वेताचे आभारही मानले आहे. Bipasha Basu |
पुढे बिपाशा म्हणाली, “मीम्स आणि ट्रोल्सनी कधीच मला मी जे आहे ते बनवलं नाही. माझ्या जागी एखादी दुसरी स्त्री असती, तर ती या क्रूरतेने खूप त्रस्त आणि दु:खी झाली असती. त्यामुळे जर आपल्याकडे अधिक मजबूत आवाज असतील, आणि स्त्रियांनीच एकमेकींचं समर्थन केलं तर महिला आणखी उंच झेप घेतील. आपण अशा स्त्रिया आहोत, ज्या कोणाच्याही अडथळ्यामुळे थांबणार नाहीत.” या पोस्टवर बिपाशा बसुचा पती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही कमेंट करून श्वेता नायरचे आभार मानले आहेत. Bipasha Basu |
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले, तर बिपाशा शेवटची ‘वेलकम टु न्यूयॉर्क’ या चित्रपटात दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. यात बिपाशाची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. त्याआधी तिने 2015 मध्ये ‘अलोन’ या चित्रपटात काम केले होते. Bipasha Basu |
हेही वाचा:





