Bill Gates and Paula Hurd : बिल गेट्स वयाच्या 69 व्या वर्षी पडले प्रेमात; गर्लफ्रेंडचं नावही सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हर्डसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. बिल गेट्स एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, मी खूप जास्त भाग्यशाली आहे की, माझ्याकडे सीरियस गर्लफ्रेंड आहे. पॉला हर्ड आणि मी एकमेकांसोबत खूप जास्त चांगला वेळ घालवत आहोत. यासोबतच आम्ही ओलंपिक्सला जातोय आणि बऱ्याच काही चांगल्या गोष्टीही करतो, असं बिल गेट्स म्हणाले.
2023 मध्ये पडले एकमेकांच्या प्रेमात
बिल गेट्स आणि पॉला हर्ड 2023 मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेकदा ते दोघे एकत्र स्पॉट होताना दिसले. मात्र, यावर पॉला हर्ड आणि बिल गेट्स यांनी काहीच भाष्य केले नव्हते. आपल्या सीरियस रिलेशनशिपवर बोलताना ते पहिल्यांदाच दिसले आहेत. बिल गेट्स यांचा 2021 मध्ये मलिंडा गेट्स हिच्यासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता मात्र त्यांनीच यावर खुलासा केला आहे.
2015 मध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान बिल गेट्स आणि पॉला यांची भेट झाली होती. दोघांनाही टेनिसची आवड आहे. दोघांचे अनेक कॉमन मित्र असल्यामुळे ते वारंवार भेटत राहिले. पॉला यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि बिल गेट्स यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता बिल गेट्स यांनीही हे नाते जाहीरपणे स्वीकारले आहे.
कोण आहेत बिल गेट्स
बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ते मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात प्रसिद्ध तंत्रज्ञान उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. गेट्स यांनी १९७५ मध्ये पॉल अॅलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि लवकरच ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक बनली.
संगणक सॉफ्टवेअरच्या विकासात, त्यांच्या धर्मादाय कार्यात आणि सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान यासह त्यांच्या आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी ते ओळखले जातात. बिल गेट्स यांनी २००० मध्ये “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” ची स्थापना केली, जी जगभरातील आरोग्य, शिक्षण आणि गरिबी निर्मूलन सुधारण्यासाठी काम करते.
कोण आहेत पॉला हर्ड?
पॉला हर्ड या ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे 2019 मध्ये कर्करोगाने निधन झाले. पॉलाला मार्कपासून कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत. पॉला यांच्या पतीने त्यांना सुमारे $500 दशलक्ष किमतीची मालमत्ता सोडली आहे. पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली आहे. पॉला हर्ड नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम करत होत्या. पॉला यांनी शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांनाही भरपूर देणगी दिली आहे.





