‘मी हातात बंदूक घेऊन सीमेवर उभा नाही’ ; ‘त्या’ विधानावर बिलावल भुट्टोचे स्पष्टीकरण

Bilawal Bhutto । पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधू पाणी कराराबाबतच्या त्यांच्या पूर्वीच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, “रॅलीमध्ये त्यांनी फक्त पाकिस्तानातील सामान्य लोकांच्या भावनांचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते,”एकतर आमचे पाणी वाहेल, किंवा त्यांचे रक्त वाहेल.” या विधानावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानवरील आरोप बिलावल भुट्टो यांनी फेटाळून लावले. एका संकेतस्थळानुसार,” पाकिस्तानला बळीचा बकरा बनवले जात आहे. आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये निष्पक्ष चौकशीची ऑफर आधीच दिली आहे. जगातील इतर अनेक देशांप्रमाणे, आपण प्रत्यक्षात धडा घेतला आहे आणि पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या या आरोपांच्या संदर्भात अंतर्गत सुधारणा देखील केल्या आहेत.” असे म्हटले.
बिलावल भुट्टो यांनी केला हा मोठा दावा Bilawal Bhutto ।
बिलावल भुट्टो पुढे म्हणाले, “इतकेच नाही तर मी परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमध्ये होता. जेव्हा मी परराष्ट्र मंत्री झालो तेव्हा पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडला, याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय समुदाय देखील स्वीकारतो की आजपर्यंत पाकिस्तानचा अशा कोणत्याही गटाशी कोणताही संबंध नाही.”
सिंधू पाणी करारावरील त्यांच्या विधानावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री म्हणाले, “मी हातात बंदूक घेऊन सीमेवर उभा नाहीये. मी सरकारमध्ये कोणतेही पद भूषवत नाहीये. भारताने या कराराचे उल्लंघन केल्याच्या दुसऱ्या दिवशी, मी सिंधू नदीच्या काठावर एका राजकीय रॅलीला संबोधित करत होतो.”
बिलावल भुट्टो यांनी त्यांचे विधान मागे घेतले Bilawal Bhutto ।
ते पुढे म्हणाले, “सत्तेत असलेल्या सरकारने म्हटले आहे की सिंधू पाणी करारातून माघार घेण्याचा कोणताही निर्णय युद्धाची घोषणा मानला जाईल. मला खात्री आहे की तुम्हाला माहिती असेल की जेव्हा युद्ध होते तेव्हा रक्तपात होतो. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे अशी कोणतीही नदी नाही जी अडवता येईल. जर भारताने पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध पाण्याचा शस्त्र म्हणून वापर केला तर त्याचा अर्थ युद्ध होईल.”
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, जलशक्ती मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी बिलावल यांच्या विधानावर जोरदार टीका केली होती. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील म्हणाले, “आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही.” त्याच वेळी, हरदीप सिंग पुरी यांनी तीव्र टिप्पणी केली आणि म्हणाले, “त्यांनी प्रथम त्यांची मानसिक चाचणी घ्यावी. अशी विधाने योग्य नाहीत.”





