“दहशतवाद्यांना पोसणे…हे काही गुपित नाही” ; पाकिस्तानच्या घाणेरड्या कृत्याची बिलावल भुट्टोकडून कबुली

Bilawal Bhutto । पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या अमेरिकेसाठी डर्टी वर्क करण्याच्या विधानावरील वाद अद्याप संपलेला नाही. बिलावल भुट्टो यांनीही त्यांच्याच सुरत सूर मिसळल्यानेदिसत आहे. कारण त्यांनी पाकिस्तानचा इतिहास दहशतवादाने भरलेला असल्याची जाहीर कबुलीच दिली आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, “संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा प्रश्न आहे. पाकिस्तानला इतिहास आहे हे मला गुपित वाटत नाही. यामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले आहे. आपण प्रत्येक वेळी मूलतत्त्ववादाचा सामना केला आहे. पण यामुळे आमचे नुकसान झाले असले तरी, त्यातून आम्ही एक धडाही घेतला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही अंतर्गत सुधारणा देखील केल्या आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे.
..तर त्यांनीही युद्धासाठी तयार असले पाहिजे Bilawal Bhutto ।
भुट्टो पुढे बोलताना,”पाकिस्तानच्या इतिहासाचा विचार केला तर तो दुर्दैवी आहे.” असे त्यानी म्हटले .काल मीरपूर खास येथे एका रॅलीला संबोधित करताना भुट्टो म्हणाले की, “पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे आणि इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे. आम्हाला युद्ध नको आहे पण जर कोणी आमच्या सिंधूवर हल्ला केला तर त्यांनीही युद्धासाठी तयार असले पाहिजे. आम्ही युद्धाचे ढोल वाजवत नाही पण जर आम्हाला चिथावणी दिली तर पाकिस्तानच्या गर्जनेने तुम्ही बधिर व्हाल.” असा इशाराच त्यांनी भारताला दिला.
ख्वाजा आसिफ काय म्हणाले? Bilawal Bhutto ।
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले होते की, पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आणि दहशतवाद्यांना निधी देण्याचा दीर्घ इतिहास आहे” तसेच आम्ही गेल्या ३० वर्षांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत” असेही त्यांनी म्हटले होते.
भारतासोबत संपूर्ण युद्धाची चर्चा करणारे ख्वाजा आसिफ यांनी,”पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा संपला आहे. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, लष्करचे काही संबंध पाकिस्तानशी भूतकाळात आढळले आहेत. तथापि, त्यांनी सांगितले की आता ही दहशतवादी संघटना संपली आहे. त्यांनी म्हटले होते की पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. आपल्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आपण आपली अण्वस्त्रे वापरू. जर युद्ध झाले तर आपण त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहोत. पुढील दोन ते तीन किंवा चार दिवसांत युद्ध भडकण्याची स्पष्ट शक्यता आहे. आसिफ म्हणाले की, “जर पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला कोणताही धोका असेल तर आम्ही त्याचा सामना करण्यास १०० टक्के तयार आहोत. पुढील काही दिवसांत युद्धाचा धोका आहे पण तो टाळता येऊ शकतो” असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.





