Pimpri | पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट
Updated On:

मावळ, – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीने पेट घेतला. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी सोमाटणे फाट्याजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, सोमाटणे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी एक दुचाकी आली. पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीस्वार दुचाकीच्या पेट्रोल टाकीचे झाकण उघडत होता. त्यावेळी अचानक दुचाकीने पेट घेतला.
दुचाकीने पेट घेताच दुचाकीस्वार खाली उतरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. परंतु दुचाकीचे नुकसान झाले.





