मोठा गौप्यस्फोट : ‘त्या’ बदल्यात तेजस्वी यादव भाजपला पाठिंबा देण्यास तयार होते

नवी दिल्ली – भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी मंगळवारी सनसनाटी दावा केला. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंब्याची ऑफर दिली होती, असे त्यांनी म्हटले.
राजदकडून करण्यात आलेला एक दावा खोडून काढताना जयस्वाल यांनी उलट दावा केला. बिहारमधील भाजपचे नेते नित्यानंद राय यांची 2019 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्याआधी राय आणि तेजस्वी यांची विमान प्रवासात भेट झाली. त्यावेळी राय यांनी राजदमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, असे राजदकडून सोमवारी सांगण्यात आले.
त्यावर जयस्वाल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यांनी नैराश्यातून खोटा दावा केला. उलट, त्यांनीच राय यांच्याकडे भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. भ्रष्टाचार प्रकरणांत केंद्र सरकारने माझ्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे. राजद त्या बदल्यात भाजपला पाठिंबा देईल अशी ती ऑफर होती.
“काश्मिरी पंडितांच्या खऱ्या यातना दाखवण्याची “त्यांच्यात” हिंमत नाही”
मात्र, भाजपने भ्रष्टाचाराशी तडजोड करण्यास नकार दर्शवला, असे जयस्वाल म्हणाले. तेजस्वी हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत.
जात प्रमाणपत्रावरून बिहारमध्ये राजकीय कुरघोडी; आता “या” नेत्याची टीका


