Tejashwi Yadav । झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला असला तरी त्याबाबत इंडिया आघाडीत अजूनही नाराजी आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव कमी जागा मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अशात इंडिया आघाडीत मोठी बिघाड होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजद आज मोठी घोषणा करू शकते. आज पत्रकार परिषद होणार आहे. आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी जागावाटपाबाबत आरजेडी मोठी घोषणा करू शकते. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी शनिवारी इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. सोरेन म्हणाले की, राज्यातील 81 विधानसभा जागांपैकी काँग्रेस आणि जेएमएम 70 जागांवर लढतील तर उर्वरित जागा इतर पक्षांमध्ये विभागल्या जातील. म्हणजे 11 जागांपैकी काही जागा आरजेडीला तर काही जागा डाव्यांना दिल्या जातील. JMM-काँग्रेसचा जागावाटपाचा निर्णय एकतर्फी – RJD आरजेडीने सोरेन यांच्या जागावाटपाचा निर्णय झामुमो आणि काँग्रेसचा एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटले आहे. झारखंड विधानसभेच्या 15 ते 18 जागा आरजेडीने ओळखल्या असल्याचा दावा आरजेडी नेते मनोज कुमार झा यांनी केला आहे. जिथे ती एकटीच भाजपचा पराभव करू शकते. ते म्हणाले की, जागावाटपाचा निर्णय टू मिनिट नूडल्सप्रमाणे लगेच घेता येणार नाही. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार, 23 नोव्हेंबरला निकाल राजदसमोर सर्व पर्याय खुले आहेत. दुसरीकडे, झारखंडमधील जागावाटपावरून आरजेडीच्या निराशेवर काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, कोणावरही नाराजी नाही. युतीमध्ये सर्व काही ठीक चालले आहे. झारखंडमधील 81 विधानसभा जागांवर दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 0000000000000