पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते होम आयसोलेशनमध्ये गेले आहेत. नितीश यांना यापूर्वी जानेवारी महिन्यात करोनाची लागण झाली होती.
नितीश यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते होम आयसोलेशनमध्ये असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यास सांगितले आहे.
“…तर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला नितीश गैरहजर होते. त्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शपथविधीला हजर झालेच पाहिजे हे आवश्यक नाही. आपला प्राधान्यक्रम ते ठरवतात, असे संयुक्त जनता दलाचे नेते उपेंद्र कुशवाह म्हणाले होते. मात्र नितीश यांच्या गैरहजेरीमागचे कारण आता उघड झाले आहे.