Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ सिझन 20ची रिलीज डेट आऊट; ‘करण-अर्जुन’चा पाहायला मिळणार तडका
Bigg Boss 20 : 'बिग बॉस 20' मध्ये नवा ट्विस्ट

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ (Bigg Boss 20 ) हा रिअॅलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोच्या आगामी सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस’ सीझन 20 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मेकर्सने ‘बिग बॉस’ सिझन 20 चा ऑफिशियल प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये रिअॅलिटी शोच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.
या नव्या सीझनमध्ये देखील सलमान खान पाहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये सलमानची एक खास झलक पाहायला मिळते. ‘करण अर्जून’च्या लूकमध्ये सलमान खानने घोड्याला पकडले असून, आपल्या हटक्या अंदाजात तो एक डायलॉग म्हणतो. (Bigg Boss 20)
‘जे ‘करण अर्जून’मध्ये घडलं, ते पुन्हा घडणार… तथास्तू’, असं सलमान खान म्हणतो. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर प्रेक्षकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Bigg Boss 20)
View this post on Instagram
‘बिग बॉस’ सिझन 20 पुढील महिन्यात 6 सप्टेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. हा रिअॅलिटी शो रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तर, कलर्स मराठीवर रात्री 10:30 वाजता टेलिकास्ट होणार आहे. (Bigg Boss 20)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस’ सिझन 20 मध्ये उर्फी जावेद, फैसल शेख, अंजली अरोरा हे स्पर्धक दिसणार असल्याची चर्चा आहे. परंतु यात कोणते कलाकार मंडळी पाहायला मिळणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस 20’ मध्ये नवा ट्विस्ट काय पाहायला मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:





