Bigg Boss Marathi: ‘वर्षा उसगांवकर’ दिसणार बिग बॉसच्या घरात? अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर, पाहा…..

Varsha Usgaonkar | Bigg Boss Marathi : लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोचे धमाकेदार प्रोमो पहायला मिळाला होता. यंदा हा शो अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. यापूर्वी हा शो महेश मांजरेकर होस्ट करत होते.
बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची प्रतीक्षा संपली आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी 5चा’ नवाकोरा प्रोमो समोर आला असून या शोचा ग्रँड प्रीमियर कधी असणार याची घोषणा करण्यात आली. या प्रोमोत रितेश देशमुखची ढोल-ताशाच्या गजरात एन्ट्री होताना दिसते.
“सगळ्यांची वाजणार, हा सीजन गाजणार तो ही रितेशच्या स्टाइलने!” अशी कॅप्शन देत या सीझनच्या तारखेचा प्रोमो शेअर करण्यात आला. या शोचा ग्रँड प्रीमियर 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता होणार आहे.
प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाह वाह करणार… पण जे वाईट वागणार त्यांची तो कानउघडणी करताना दिसणार आहे.
दरम्यान, नव्या प्रोमोद्वारे ‘बिग बॉस मराठी 5चा’ तारीख जाहीर करण्यात आली असून, या शोचा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.
त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अनेकांची नावं सध्या समोर येत असून आता यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे.
View this post on Instagram
वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत! या मालिकेत दिसत होत्या. पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे.
त्यामुळे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. पण त्यांच्या टीम किंवा स्वतः अभिनेत्रीने सुद्धा अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.





