Bigg Boss Marathi 5: तू निघ..चल फूट..! ‘बीबी’च्या घरात झाला जोरदार राडा; ‘जान्हवी आणि सूरज’चा गोलीगत झगडा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले.
आता दुसऱ्या आठवड्यातही 15 सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहेत.
प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय,”तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही”. त्यावर गोलीगत सूरज जान्हवीला म्हणतो,”तू निघ… चल फूट”.
View this post on Instagram
गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा…





