Bigg Boss Marathi 5 : ‘तोंडावर नॉमिनेट करणार..’; ‘बीबी’च्या घरात रंगली संग्राम अन् जान्हवीची स्टॅटर्जी

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजपासून जंगलराज असणार आहे. घरातील सर्व मंडळी टास्कमध्ये एकापेक्षाएक खेळ खेळण्यासोबत त्याव्यतिरिक्त मजा-मस्ती करतानादेखील दिसत आहेत. या सर्व गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि संग्राम गप्पा मारताना दिसून येणार आहेत. जान्हवी संग्रामला म्हणतेय,”त्यांचं टार्गेट सांगू मी तुम्हाला एक तुम्ही आहात आणि आता मी पण असू शकते.
View this post on Instagram
तो सेफ गेम खेळणार हे मला माहिती आहे. पण तरी मी तोंडावर दोघांना नॉमिनेट करणार आहे”. त्यानंतर अरबाज आणि जान्हवी टास्कबद्दल चर्चा करताना दिसून येतात.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज सदस्यांमधील मजा-मस्ती पाहायला मिळणार आह. आजच्या भागात निक्की, डीपी दादा आणि अभिजीतमध्ये चहावरुन गंमती होताना पाहायला मिळणार आहेत. निक्की डीपी दादाला म्हणतेय की,”तिचा हात लागून चहाची गोडी वाढली आहे”





